मंगळवार, १८ जानेवारी, २०११

आरसा

दररोज सकाळी उठतो,
आरशयात आपला चेहरा बघतो,
मला तर सवय झलिये,
पण हा आरसा कसा सहन करतो??

निदान मी तरी दिवसात,
१०-१५ लोकाना भेटतो,
पण माझा चेहरा बघण्याशिवाय,
त्या आरशयाला काही पर्यायच नसतो!!

पर्याय आणि शिकवण एकच,
आरशासारखे जगावे,
तुटला, फुटला, भग्न झाला,
तरी स्वतःचे अंतकरण जपावे

हा आरसा काय करतो??
स्वतःचे 'मी'पण राखून ठेवतो,
पण माझ्यातला हरवलेला मी,
मला दररोज शोधून देतो

बाहेरचे जग बघावे,
कधी आले नसेल त्याच्या मनात??
मनात मजलेला काहूर,
कधी सांगावे कुणाच्या कानात!!

एकेदिवशी रागाच्या भरात,
मी त्याला जोरात आपटला,
बंधनातून मुक्त झाल्यासारखा,
प्रत्येक तुकडा जमिनीवर पसरला!!

तरी प्रत्येक अणू असा वागे,
आहे जणू सबंध,
प्रत्येकाचे अस्तित्व,
होते प्रत्येकात चिरेबंद!!

भग्न आम्ही दोघेही होतो,
पण अस्तित्व त्यान जपल,
दुसर्‍याच 'मी'पण शोधण्यातच,
त्याच सार आयुष्य खपल!!!

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

पण नकळच सारे घडले...

पहिल्यांदा तुला पाहील,
डोळे अचानक स्वप्नानी भरले,
आयुष्यातले सर्व क्षण,
डोळ्यांदेखत सरले,
प्रेम करण्याचा इरादा तर नव्हता,
पण नकळच सारे घडले...

तुझ्या आठवणीच्या गराड्यात,
सतत मन रुळले,
भविष्यातल्या स्वप्नाशी,
एक वेगळेच गणित जूळले,
स्वप्न रंगविण्याचा इरादा तर नव्हता,
पण नकळच सारे घडले...

तू जेव्हा दूर गेलीस,
तेव्हा काही विचित्रच घडले,
माझ्या दुखात सामील होऊन,
वरुन आभाळही रडले,
अश्रू ढ|ळण्याचा इरादा तर नव्हता,
पण नकळच सारे घडले...
पण नकळच सारे घडले...

प्रेम एकदा करून तर बघतो..

प्रेम एकदा करून तर बघतो...
असच एकदा, जगून तर बघतो...

मन वेड्या सारख धावत,
अन् मी मनामागे धावतो,
आजकालचा प्रत्येक दिवस,
तिच्या आठवणीतच पावतो,
माझ मलाच कळत नाही मी असा का वागतो ||धृ||

सर्व चेहरयांमध्ये माझे डोळे,
तीचाच चेहरा शोधत असतात,
एकटा जेव्हा असतो मी,
शून्यातच हे बघत असतात,
आजूबाजूच्या घोळकयातही मी एकटाच उभा ठ|कतो ||धृ||

प्रेम म्हणजे थोड घेण, प्रेम म्हणजे थोड देण,
प्रेम म्हणजे देता देता सर्वस्वी दुसर्‍याच होऊन जाण,
देण्याची आणि घेण्याची बेरीज प्रेमा मध्ये शून्य आहे,
म्हणूनच गणिताची ही अट मला पूर्णपणे मान्य आहे,
प्रेमाच हे कोडे, मीही एकदा सोडवून बघतो ||धृ||