दररोज सकाळी उठतो,
आरशयात आपला चेहरा बघतो,
मला तर सवय झलिये,
पण हा आरसा कसा सहन करतो??
निदान मी तरी दिवसात,
१०-१५ लोकाना भेटतो,
पण माझा चेहरा बघण्याशिवाय,
त्या आरशयाला काही पर्यायच नसतो!!
पर्याय आणि शिकवण एकच,
आरशासारखे जगावे,
तुटला, फुटला, भग्न झाला,
तरी स्वतःचे अंतकरण जपावे
हा आरसा काय करतो??
स्वतःचे 'मी'पण राखून ठेवतो,
पण माझ्यातला हरवलेला मी,
मला दररोज शोधून देतो
बाहेरचे जग बघावे,
कधी आले नसेल त्याच्या मनात??
मनात मजलेला काहूर,
कधी सांगावे कुणाच्या कानात!!
एकेदिवशी रागाच्या भरात,
मी त्याला जोरात आपटला,
बंधनातून मुक्त झाल्यासारखा,
प्रत्येक तुकडा जमिनीवर पसरला!!
तरी प्रत्येक अणू असा वागे,
आहे जणू सबंध,
प्रत्येकाचे अस्तित्व,
होते प्रत्येकात चिरेबंद!!
भग्न आम्ही दोघेही होतो,
पण अस्तित्व त्यान जपल,
दुसर्याच 'मी'पण शोधण्यातच,
त्याच सार आयुष्य खपल!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा